अजूनही ९०% नवबौद्ध हिंदूच
लवकरच बौद्ध धम्म लयास जाणार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्म स्वीकारला.धम्म स्वीकारताना बाबासाहेब म्हणाले होते,'मी बौद्ध धम्म स्वीकारला म्हणून तुम्ही स्वीकारलाच पाहिजे असे नाही.बुध धम्म पचवण्यास खूप अवघड आहे.यातील नियम खूप कडक आहेत.जमत असेल तर स्वीकारा.नाहीतर लोक म्हणतील महारांनी बौद्ध धम्म बाटवला .'
बाबासाहेबांनी अगोदरच ओळखले होते.आपली भोळी ,अडाणी जनता हा धम्म पचवू शकत नाही.पण हा विज्ञानवादी धम्मच या पिढ्यानपिढ्या सतावल्या गेलेल्या जनतेला तारू शकतो.दुसऱ्या धर्मात गेलो तर 'आगीतून उठून फुफाट्यात' पडल्यासारखे होईल.
खूप विचारांती बाबासाहेबांनी हा धम्म स्वीकारला.त्यांच्याबरोबर त्यांच्यावर विश्वास असणाऱ्या त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या लाखो दलितांनी धम्म स्वीकारला.
पण पिढ्यानपिढ्या हिंदू धर्माचे पडलेले संस्कार एकदम कसे जातील?
दोरीला पीळ पडल्यानंतर तो लगेच जातो का? म्हणतात ना 'सुंभ जळाला तरी पीळ जात नाही.' तेच खरे .
एकतर समाज मोठ्या संखेने अडाणी होता .दरिद्री पिढीजात होती.घरात मुलांची संख्या जास्त.शेतीवाडी कमी लोकांकडे.तीही इनाम मिळालेली.सर्व आयुष्यच लोकांच्या शेतावर मजुरी करण्यात गेलेले .जोहार घालायची सवय अंगी उतरलेली.शिकणे आपले काम नाही .अशी प्रवृत्ती झालेली.
आणि अश्या वातावरणात बाबासाहेबांच्या कार्याचा प्रभाव पडल्याने,बाबासाहेबांचे विचार पटल्याने.बाबासाहेबांचे मागे जाऊन त्यांची शिकवण अनुसरण्याची शपथ घेतल्याने बहुसंख्य महार समाज बौद्ध धम्म स्वीकारता झाला.अस्पृश्यांपैकी बोटावर मोजण्या इतके इतर समाजातील लोकच बौध्द धम्मात आले.त्यामुळेच बौध्द धम्म म्हंटले कि ,आजही लोक त्यांना पूर्वाश्रमिचे महार म्हणूनच ओळखतात. बहुसंख्य इतर मागासवर्गीय सुद्धा त्यांच्याकडे हीन भावनेनेच बघतात.
इतके सगळे असूनही पूर्वीचे महार व १९५६ नंतरचे बौद्ध, म्हणजेच नवबौद्ध .
आजही खे बौद्ध झाले आहेत का ? हा प्रश्न महत्वाचा आहे.
याचे बहुतांशी उत्तर नाही असेच द्यावे लागेल .
कारण जरी महारांनी बौध्द धम्म स्वीकारला असला तरी हिंदू मानसिकतेतून ते अजूनही बाहेर पडलेले नाहीत.
बाबासाहेबांच्या चळवळीत बाबासाहेबांबरोबर ज्यांनी भाग घेतला होता.ज्यांना बाबासाहेबांचे अप्रूप होते.त्यांनी थोड्याफार प्रमाणात बौद्ध धम्म सांभाळला.पण नंतरच्या पिढी तर फक्त बोलूनचालून बौद्ध झाल्या.
हिंदूंचा एकही सन साजरा केल्याशिवाय बौद्द धर्मीय राहत नाहीत.मग तो दिवाळी असो किंवा दहीहंडी असो.नवरात्र उत्सवात सर्वात जास्त संखेने शहरात नाचणारे बौद्ध्च दिसतात.शिकलेल्या लोकांकडून बौद्ध धम्म सक्तीने पाळला जाण्याची बाबासाहेबांची अपेक्षा असेल.पण त्यांनी तर अधिक जोमाने हिंदू धर्माचेच अवलोकन केले.बाबासाहेबांनी म्हंटले होते.मी हिंदू धर्मातील कुठल्याही देवाला मानणार नाही,'देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.'प आमचे शिक्षित लोक देवभोळे झालेले दिसतील.त्यांचे देव जरा वरच्या दर्जाचे आहेत.म्हणजे साईबाबा,बालाजी,गजानन महाराज ,साप्त्सृंगी देवी,गणपती.........शिकून आरक्षणावर नोकरी मिळालेले आणि त्यामुळे मोठे झालेले साहेब लोक या मोठ्या देवांना भाजताना दिसतात. जरी घरात बाबासाहेब आणि गौतम बुद्धाचा फोटो असेल तर सोबतीला कुलदैवत ,आणि वर सांगितलेले देवांचे फोटो असतातच.काही महाभाग तर बाबासाहेबांचा फोटो न लावता फक्त गौतम बुद्धांची मूर्ती शो पीस म्हणून लावतात.
मोठ्या आदराने गणपती बसवतात.आणि जे काही सुख वैभव मिळाले ते गणपती मुळे मिळाले असे वर तोंड करून सांगतात सुद्धा .साईबाबाच्या कृपेने नोकरीत बढती मिळाली असे सांगताना त्यांना काहीच वाटत नाही.जर तुमची शैक्षणिक पात्रता नसती तर साई बाबाने तुम्हाला बढती मिळवून दिली असती का? असे विचारले तर तोंड बंद होते.
मोठ्या हुद्द्यांवर असणारे साहेब लोक घरातील आनंदाच्या कार्यक्रमात कुलदैवताला भजल्याशिवाय राहत नाहीत.
वास्तूशांती हा प्रकार सर्हास सुरु आसतो.मग गृह्प्रवेशावेळेस सत्य नारायणाची महापूजा घातली जाते.
घरात सुखशांती लाभावी म्हणून नारायण नागबली सुद्धा करणारे आणी हजारो रुपये त्यात घालवणारे महाभाग या बौध्द धम्मात दिसतात.
बौद्ध धम्मात हिंसेला थारा नाही पण येथे मौसाहारी देवांना कोंबडी बकरीचा बळी दिला जातो.
विशेष म्हणजे सर्व सन इतक्या उत्साहाने साजरे केले जातात कि ,हिंदू लोकांनाही लाज वाटेल .
अजूनही गावच्या जत्रांना कोणी विसरले नाही.गम्मत म्हणून जाण्यास हरकत नाही .पण भक्ती भावाने जायलाच पाहिजे का?
यावर खूप मोठे उत्तर असते ,'मी नाही मानत हो पण माझ्या आईवडिलांसाठी करावे लागते,किंवा बायकोसाठी करावे लागते.'
उपासतापासातही हे लोक मागास नाहीत.अगदी निर्जळी उपवास सुद्धा पकडले जातात.
बालाजीला गेले तर केस दिल्याशिवाय येत नाहीत .साईबाबाच्या दर्शनासाठी वर्षातून एक वारी असतेच असते.
अनेकांच्या घरात देव्हारा असतो.प्रदर्शनी भागात नसेल तर आतल्या घरात नक्कीच असतो.
मोठ्या संखेने लोक आता हिंदू धर्माकडे आकर्षित होताना दिसत आहेत.
पुढील काही वर्षात बौद्ध धम्म पुन्हा एकदा लयास गेला तरी नवल वाटावयास नको.
कारण बौध्द धम्म महारांचा म्हणून इतर धर्मीय यात येत नाहीत आणि जे बौद्ध आहेत त्यांना हिंदू धर्माचे आकर्षण सुटत नाही.
मग पुन्हा चौथ्यांदा बौध्द धम्माचे पुनरुत्थान करण्यासाठी आणखी एका महामानवाला जन्म घ्यावा लागेल हेच खरे.
टीप:कृपया कट्टर बौद्धांनी मनाला लाऊन घेऊ नये.
कट्टर बौद्ध:
त्रिशरण पंचशील रोज म्हणतात,
कुठल्याच देवाला मानत नाहीत.अगदी कुलदैवताला सुद्धा,
जत्रेला गम्मत म्हणून जातात.
चागल्या कार्यक्रमात सत्यनारायण घालत नाहीत.
कुठल्याही चांगल्या कामाचे श्रेय स्वताला देतात; देवाला नाही.
मुलाबाळांवर बाबासाहेबांचे विचार रुजवतात.
घरात बाबासाहेब आणि बौद्धांशिवाय कोणता फोटो ठेवत नाहीत.
Fact
ReplyDeleteFact
ReplyDelete