Wednesday, 15 January 2014

प्रेम काय असत ग ?

प्रेम काय असत ग ?

'ये स्मिता ,खरच का ग कुमार माझ्यावर प्रेम करतो.'' सविताने स्मिताला भाबडेपणाने विचारले.
'मला नाही माहित ग ,करीना म्हणत होती.' स्मिता.
'पण तिला कोणी सांगितले?"सविता
'' त्यानेच सांगितले असेल ग ''
पण तो कशाला तिला सांगेल? प्रेम माझ्यावर करतो आणि करीनाला कशाला सांगेल? त्याने मलाच सांगायला काय झाले होते?" 
''हो ग, पण तो तुला घाबरला असेल.'
'प्रेम करतो ना,मग कशाला घाबरतो मला तो ?''
''आता मला काय माहित? मला वाटले म्हणून बोलले मी.''
''काय ग , प्रेम करतो म्हणजे काय करतो ग ?"
'' मला नाही माहित ग,मी निंही पाहिले कुणाला प्रेम करताना ''
''अग,तो माझ्या घराजवळून नेहमी चकरा मारतो,माझ्या घराकडे बघत असतो.परवा मला माझ्या लहान भावाने पण सांगितले.तो काल बराचवेळ तिथे उभा होता .'
'अग,त्याचे काही काम असेल .'
'नाही ग,तो मुद्दामच माझ्या घराकडे येतो,कधी कधी ना ते लिंबाचे झाड आहे ना ?''
''कोणते ग '
'अग ते नाही का त्या टपरीच्या बाजूला,सुनीताच्या घराकडे जाताना?' 
'अच्छा ,ते?'
हो .तेच.तेथेच उभा होता म्हणे काल खूप वेळ.'
कशाला उभा होता ग?'
'आता मला काय माहित?"
अग,तुझ्यासाठीच असेल मग?"
असे कशाला उभे राहतो? माझ्याकडे काही काम असेल तर मग त्याने सांगावे ना,जमेल तर करेन नाहीतर नाही सांगेन.'
'होग, त्याने सांगायला काय हरकत आहे.मूर्खच आहे .'
'नाही तर काय?'पण काय ग सांग ना प्रेम म्हणजे काय ?'
अग,खरेच मला नाही माहित.मला वाटते.तो जे करतो ना.तेच प्रेम असते.''
'म्हणजे माझ्या घराजवळ चकरा मारतो ते प्रेम असते? तो माझ्यासाठी माझ्या घराजवळ बघत थांबतो ,ते प्रेम असते?'
'थांब ह,ती बघ संगीता येते आहे. तिला माहित असेल प्रेम म्हणजे काय आहे ते .मी तिलाच विचारते.''
''नको ग .ती काय म्हणेल ?"
''त्यात काय विशेष ? ती करते ना प्रेम ? मग आपल्यालाही प्रेम काय असते ते सांगेल ना?'
''नको बाबा मला भीती वाटते .भलतं सलतं काही असलं तर मला माझे वडील घरात नाही घेणार .''
''नाही ग तसे काही नसणार .थांब ती आली बघ ,तिलाच विचारते.काय ग संगीता,कुठे गेली होतीस?''
'काही नाही ग ,पिक्चरला गेली होती.''संगीता 
'एकटीच?'सविता
'नाही ग,चैतन्य होता ना बरोबर.'' संगीता 
''चैतन्य रायभोळे ?"स्मिता
'हो तोच .'संगीता
'मग त्याच्याबरोबर का गेलीस ? मैत्रिणी नव्हत्या का? घरच्यांबरोबर जायचे ना?' स्मिता.
'मग त्याच्याबरोबर गेले तर काय झाले? तो माझा मित्र आहे .मी त्याच्यावर प्रेम करते?'संगीता 
'काय ग प्रेम करते ग ?"सविता.
'अग,प्रेम करतो म्हणजे तो मला आवडतो मी त्याला आवडते.आणि मग त्याच्याबरोबर पिक्चरला गेले तर काय हरकत आहे ?"संगीता
'काग ,घरच्यांनी पाहिले तर तुला रागावणार नाहीत का?"सविता 
'घरच्यांना कळेल तेंव्हा ना? 'संगीता
'मग आज तू पिक्चरला गेली होती ,ते घरी सांगून गेली होती का?'स्मिता.
'अग तू पागल आहेस का? घरी सांगून कोणी जाते का ?'संगीता
'मग तू कशी काय गेलीस?"सविता 
'अग मी मनीषाबरोबर जाते आहे असे सांगून गेली होती.'संगीता
'म्हणजे तू खोटं बोलून गेलीस?'स्मिता
'मग खोटच बोलावे लागते.कोणी सोडणार आहे का आपल्याला असे कोणाबरोबर?"संगीता
'अग,तूच तर आता म्हणाली होतीस ना ? कि तुम्ही एकमेकांवर प्रेम करता म्हणून.''सविता 
'हो मग काय असे जगाला दाखवत बसायचे का?"संगीता
'काय ग ,आता तर संध्याकाळ आहे,मग तू स्कार्फने पूर्ण तोंड का बांधून घेतले आहेस?"स्मिता
'अग, कोणी पाहिले मग?'हि बरी सोय असते.''संगीता
'म्हणजे प्रेम चोरून चोरून करायचे असते का?"सविता.
'जोपर्यंत सगळ्यांना माहित होत नाही तोपर्यंत चोरून चोरूनच करायला लागते.'संगीता
'आणि नाही केले तर ?"सविता
'ते आपल्यावर आहे करायचे तर करा नाही करायचे तर नका करू .कोणी जबरदस्ती केली आहे.''संगीता 
'काय ग ,एखादा मुलगा आपल्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो ग ?"स्मिता
'अग,तो सुरुवातीला आपल्याकडे सारखे बघत बसतो.आपल्या रस्त्यावर आडवा येतो,उगीच आपल्या मागे रेंगाळतो,आपण क्लास लावला तेथेच क्लास लावतो.आपल्यासाठी शाळेत येतो.वर्गात असेल तर सारखा बघत असतो ,चिठ्ठी लिहितो.आपल्या मैत्रिणीला सांगायला सांगतो,मुद्दाम बोलायला बघतो.'संगीता
'मग आपण त्याच्याशी नाही बोललो तर? त्याच्याकडे नाही पाहिले तर? ''स्मिता
'तर काही नाही.तो त्याचे काम करतो आपण आपले काम करत राहायचे .आपला अभ्यास करत राहायचा.त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही.''संगीता
'पण तो सारखाच बघत असेल? मागे मागे येत असेल .घराजवळ चकरा मारत असेल तर?"स्मिता
'जर त्रास देत असेल तर सरांना किंवा madam ना नाव सांगणे नाहीतर आईला सांगणे.पण कधीच दुसऱ्या मुलांना सांगू नये.'संगीता
'काग?'सविता 
'अग,त्यांची भांडणे होतात, मारामाऱ्या होतात.मग चर्चा होतात.आपले नाव बदनाम होते.आपल्या आईवडिलांची बदनामी होते.मग घरगुती भांडणे होतात. त्या मुलाला जास्त मार बसला असेल तर तो मग आपल्याला आणखी त्रास देऊ शकतो,रस्त्यात अडवू शकतो.काग,अश्या काय विचारताय ? कोणाच्या प्रेमात पडलात कि काय?"संगीता
'नाही ग 'स्मिता,सविता
'मग एकदम असे काय विचारताय ?"संगीता
'सहज विचारले .'स्मिता'
'सहज कसे काय विचारले?"संगीता
'एक मुलगा आहे ना ,आमच्या शाळेतला तो आमच्या एका मैत्रिणीच्या मागे लागला आहे .तो म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो .'स्मिता
'अग,तुमची वय काय आहेत? तुम्ही आताशी सातवीत आहात.तुम्हाला कशाला हवे प्रेमबीम ? चांगला अभ्यास करायचा.आईबापाचे नाव कमवायचे.स्वतःचे करियर बनवायचे .चांगले शिकायचे.नोकरी करायची.साहेब व्हायचे.मग आईबापाच्या संमतीने चांगल्या मुलाशी लग्न करायचे .आणि मग त्याचेवर प्रेम करायचे अगदी मरेपर्यंत .या टीवी सिरीअलच्या नादी नाही लागायचे,पिक्चरमध्ये दाखवतात त्यांच्या नदी नाही लागायचे.ते सगळे खोटे असते.असे होत नाही.आणि होतही असेल तर आपण तसे करायलाच पाहिजे का?"संगीता
'नाही.'स्मिता,सविता
'हुशार आहात हो दोघी .कुठे चालल्या आहात?'संगीता
'कुठे नाही.क्लासवरून आलो घरी चाललो आहोत.'स्मिता
'ठीक आहे .चलते मी 'संगीता
'बर झाले ग सांगितला विचारले .नाहीतर माझे काही खरे नव्हते.'सविता
'हो ,बघितले ना? स्वतः करते आणि आपल्याला नाही म्हणते.'स्मिता
'नाही ग, ती बरोबरच बोलली आहे .तिला अनुभव आला असेल ना?"सविता
'मग आपण नाही घ्यायचा अनुभव?"स्मिता'
'घ्यायचा ना.पण लग्नानंतर 'सविता
'चल जाऊदे ते प्रेमबीम .उद्यापासून त्या कुमार कडे बघू नकोस.मारू दे त्याला किती चक्र मारायच्या आहेत त्या.जाईल कंटाळून आणि मग देईल नाद सोडून.'स्मिता
'हो तसेच करते.पण तू माझ्या सोबत राहत जा .'सविता
'तुझ्याच सोबत आहे बाई ,घाबरतेस काय वेळ आली तर घरीपण सांगून टाकूया .'स्मिता
'हो हो चल घरी ,उशीर झाला आहे.'सविता .
'चल,प्रेमाला बाय बाय .'

No comments:

Post a Comment