विद्रोहाचा सूर्य मावळला
(सुर्योदय १५ फेब्रुवारी १९४९-सूर्यास्त १५ जानेवारी २०१४ )
'जीवन म्हणजे दोन मांड्यातून येणे
आणि चार खांद्यांवरून जाणे'
मला कळायला लागले तेंव्हा लढाऊ संघटना म्हणून दलित प्यान्थर हि नावारूपाला आलेली जहाल संघटना होती.या संघटनेचे तरुणांना मोठे अप्रूप होते.त्यात मीही होतो.
राजकीय जीवनाला सुरुवात करताना सुरुवातीला दलित प्यान्थर या सामाजिक संघटनेने मला रस्ता दाखवला.
प्यान्थरने आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे मी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.
पद्मश्री नामदेव ढसाळ साहेब,अरुण कांबळे सर,मा.रामदास आठवले,भाई संगारे,गंगाधर गाडे या नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी आम्ही खूप पायपीट करून जात होतो.
सर्वच नेते जहाल भाषणे करून तरुणांची मने पेटवत होती.
प्यान्थरकी स्थापनाच मुळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या विरोधात झाली आहे.कारण रिपाईचे नेते कॉंग्रेसला मदत करत होते.त्याच्या विरोधात प्यान्थरने तरून हि संघटना उभी केली.आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रात हि जहाल संघटना पोचली.नामांतर चळवळ या संघटनेने उचलून धरली.
शिवसेनेला रोखण्याचे काम प्यान्थरने केले.
हि संघटना उभी करण्यात पद्मश्री नामदेव ढसाळ,ज वी पवार, राजा ढाले,अरुण कांबळे ,भाई संगारे यांचे मोठे योगदान आहे.
पद्मश्री नामदेव ढसाळ हे जरी प्यान्थरचे संस्थापक असले तरी त्यांनीच हि संघटना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.कारण या संघटनेच्या नावावर काही तरुण लोकांची फसवणूक करत होते.तेच त्यांना आवडले नाही.मग त्यांनी मास मुव्ह्मेंटची स्थापना केली.आणि ती संघटना चालवली.
दलित प्यान्थर ची कल्पना नामदेव ढसाळ व ज वी पवार यांना अमेरिकेच्या ब्ल्याक प्यान्थर या संघटनेवरून सुचली. आणी त्यांनी ती लढाऊ संघटना १९७२ मध्ये उभी केली.आणि थोडयाच दिवसात ती नावारूपाला आणली.
पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी चळवळीबरोबरच सामाजिक भानही ठेवले.त्यांनी त्यांचा विद्रोह चळवळीतून जसा दाखवला तसाच तो कवितेतुनही दाखवला. ते जागतिक कीर्तीचे कवी होते. त्यांच्या सानिध्यात येण्यासाठी जगभरातील कवी धडपड करायचे .
त्यांचा आडदांड देहच समोरच्याच्या मनात धडकी भरवायचा.
जसे ते मोठे नेते म्हणून नावारूपाला आले तसेच ते एक जागतिक कवी म्हणून नावारूपाला आले .आज संपूर्ण जग त्यांच्या अस्ताने अंधारात गेले आहे..
पद्मश्री नामदेव ढसाळ हे अवघ्या ६४ व्या वर्षी अनंतात विलीन झाले आहेत.
पण त्यांनी निर्माण केलेले साहित्य सतत आम्हाला प्रेरणा देत राहिल.त्यांचे बालपण अतिशय हलाखीचे गेले.त्यांचा जन्म पुण्यातील एका गावात झाला असला तरी त्यांचे बरेचसे आयुष्य मुंबईतील गोलपिठा येथे गेले .त्यांनी काही काल ट्यांक्षी हि चालवली.
त्यांनी १९७३ मध्ये गोलपिठा हा धगधगीत कविता संग्रह प्रशिध्द करून एकच खळबळ उडवून दिली.त्यांनी नवनवीन शब्द साहित्याला दिले आहेत.
गोलपिठा बरोबरच तुही यत्ता कोणची?,खेळ,प्रिय दर्शनी,या सत्तेत जीव रमत नाहीत,गांडू बगीचा,मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे,तुझे बोट धरून मी चाललो आहे, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवला.त्याच बरोबर आंबेडकरी चळवळ,आंधळे शतक,हाडळी हाडवळा,उजेडाची काळी दुनिया,सर्व काही समस्टीसाठी ,बुद्ध धम्म-काही शेष प्रश्न.या सारखे साहित्य त्यांनी लिहिले आहे.
त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला आहे त्याच बरोबर सोव्हियत ल्यांड नेहरू अवार्ड (गोलपिठा साठी १९७४) १९९९ मध्ये साहित्यासाठी पद्मश्री मिळाले,२००४ मध्ये गोल्डन लाइफ टाईम अचीवमेंट साहित्य अकादमीने दिला.
नामदेव ढसाळ यांनी मध्यंतरी शिवसेनेबरोबर समजोता केला होता. पण त्यांना शिवसेनेने त्यांना न्याय दिला नाही.सेनेच्या सामना या वृत्तपत्रात ते दर शनिवारी 'सर्व काही समस्टीसाठी' हे सदर लिहित होते.त्यातून त्यांनी बरेच नवीन शब्द साहित्याला दिले आहेत.ते खूप चांगले वाचक होते.
त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्यांनी योगदान दिले त्या शाहीर अमर शेख यांची मुलगी मल्लिका यांच्या बरोबर त्यांचा विवाह झाला होता.
मल्लिका यांनी 'मला उध्वस्त व्हायचेय'या नावाने आत्मकथा लिहून खळबळ उडवून दिली होती.नामदेव ढसाळ हे माणुसकी जपणारे होते.
एक घटना आठवते .मा.आमदार रिपब्लिकन नेते गायकवाड यांच्या मुलाचे लग्न दादर येथे हिंदू कॉलनीत होते .मा.नामदेव ढसाळ हे दवाखान्यात होते.पण मा. गायकवाड यांच्या मुलाचे लग्न होते म्हणून ते दवाखान्यातून हॉलच्या गेट पर्यंत व्हील चेअर वर आले होते .आम्ही त्यांना भेटायला गेलो.त्यांचा आशीर्वाद घेतला .तेंव्हा सुमन्त गायकवाड यांच्या पत्नींना खूप आनंद झाला होता.'आजारी असतानाही माझ्या मुलाला आशीर्वाद द्यायला तो आला असे त्या त्या आम्हाला सांगत होत्या .नामदेव आणि मी एका वर्गात होतो.मी त्याला भाऊ मानला आहे .तो भलेही गेट पर्यंत आला असला तरी मला खूप आनंद झाला आहे .'
आमच्यात नसलेल्या पण आम्हाला सतत रस्ता दाखवणाऱ्या योग्य मार्ग दाखणाऱ्या पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन .

No comments:
Post a Comment