Wednesday, 15 January 2014

अजूनही ९०% बौद्ध हिंदूच


अजूनही ९०% नवबौद्ध हिंदूच 
लवकरच बौद्ध धम्म लयास जाणार 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्म स्वीकारला.धम्म स्वीकारताना बाबासाहेब म्हणाले होते,'मी बौद्ध धम्म स्वीकारला म्हणून तुम्ही स्वीकारलाच पाहिजे असे नाही.बुध धम्म पचवण्यास खूप अवघड आहे.यातील नियम खूप कडक आहेत.जमत असेल तर स्वीकारा.नाहीतर लोक म्हणतील महारांनी बौद्ध धम्म बाटवला .'
बाबासाहेबांनी अगोदरच ओळखले होते.आपली भोळी ,अडाणी जनता हा धम्म पचवू शकत नाही.पण हा विज्ञानवादी धम्मच या पिढ्यानपिढ्या सतावल्या गेलेल्या जनतेला तारू शकतो.दुसऱ्या धर्मात गेलो तर 'आगीतून उठून फुफाट्यात' पडल्यासारखे होईल.
खूप विचारांती बाबासाहेबांनी हा धम्म स्वीकारला.त्यांच्याबरोबर त्यांच्यावर विश्वास असणाऱ्या त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या लाखो दलितांनी धम्म स्वीकारला.
पण पिढ्यानपिढ्या हिंदू धर्माचे पडलेले संस्कार एकदम कसे जातील?
दोरीला पीळ पडल्यानंतर तो लगेच जातो का? म्हणतात ना 'सुंभ जळाला तरी पीळ जात नाही.' तेच खरे .
एकतर समाज मोठ्या संखेने अडाणी होता .दरिद्री पिढीजात होती.घरात मुलांची संख्या जास्त.शेतीवाडी कमी लोकांकडे.तीही इनाम मिळालेली.सर्व आयुष्यच लोकांच्या शेतावर मजुरी करण्यात गेलेले .जोहार घालायची सवय अंगी उतरलेली.शिकणे आपले काम नाही .अशी प्रवृत्ती झालेली.
आणि अश्या वातावरणात बाबासाहेबांच्या कार्याचा प्रभाव पडल्याने,बाबासाहेबांचे विचार पटल्याने.बाबासाहेबांचे मागे जाऊन त्यांची शिकवण अनुसरण्याची शपथ घेतल्याने बहुसंख्य महार समाज बौद्ध धम्म स्वीकारता झाला.अस्पृश्यांपैकी बोटावर मोजण्या इतके इतर समाजातील लोकच बौध्द धम्मात आले.त्यामुळेच बौध्द धम्म म्हंटले कि ,आजही लोक त्यांना पूर्वाश्रमिचे महार म्हणूनच ओळखतात. बहुसंख्य इतर मागासवर्गीय सुद्धा त्यांच्याकडे हीन भावनेनेच बघतात.
इतके सगळे असूनही पूर्वीचे महार व १९५६ नंतरचे बौद्ध, म्हणजेच नवबौद्ध .
आजही खे बौद्ध झाले आहेत का ? हा प्रश्न महत्वाचा आहे.
याचे बहुतांशी उत्तर नाही असेच द्यावे लागेल .
कारण जरी महारांनी बौध्द धम्म स्वीकारला असला तरी हिंदू मानसिकतेतून ते अजूनही बाहेर पडलेले नाहीत.
बाबासाहेबांच्या चळवळीत बाबासाहेबांबरोबर ज्यांनी भाग घेतला होता.ज्यांना बाबासाहेबांचे अप्रूप होते.त्यांनी थोड्याफार प्रमाणात बौद्ध धम्म सांभाळला.पण नंतरच्या पिढी तर फक्त बोलूनचालून बौद्ध झाल्या.
हिंदूंचा एकही सन साजरा केल्याशिवाय बौद्द धर्मीय राहत नाहीत.मग तो दिवाळी असो किंवा दहीहंडी असो.नवरात्र उत्सवात सर्वात जास्त संखेने शहरात नाचणारे बौद्ध्च दिसतात.शिकलेल्या लोकांकडून बौद्ध धम्म सक्तीने पाळला जाण्याची बाबासाहेबांची अपेक्षा असेल.पण त्यांनी तर अधिक जोमाने हिंदू धर्माचेच अवलोकन केले.बाबासाहेबांनी म्हंटले होते.मी हिंदू धर्मातील कुठल्याही देवाला मानणार नाही,'देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.'प आमचे शिक्षित लोक देवभोळे झालेले दिसतील.त्यांचे देव जरा वरच्या दर्जाचे आहेत.म्हणजे साईबाबा,बालाजी,गजानन महाराज ,साप्त्सृंगी देवी,गणपती.........शिकून आरक्षणावर नोकरी मिळालेले आणि त्यामुळे मोठे झालेले साहेब लोक या मोठ्या देवांना भाजताना दिसतात. जरी घरात बाबासाहेब आणि गौतम बुद्धाचा फोटो असेल तर सोबतीला कुलदैवत ,आणि वर सांगितलेले देवांचे फोटो असतातच.काही महाभाग तर बाबासाहेबांचा फोटो न लावता फक्त गौतम बुद्धांची मूर्ती शो पीस म्हणून लावतात.
मोठ्या आदराने गणपती बसवतात.आणि जे काही सुख वैभव मिळाले ते गणपती मुळे मिळाले असे वर तोंड करून सांगतात सुद्धा .साईबाबाच्या कृपेने नोकरीत बढती मिळाली असे सांगताना त्यांना काहीच वाटत नाही.जर तुमची शैक्षणिक पात्रता नसती तर साई बाबाने तुम्हाला बढती मिळवून दिली असती का? असे विचारले तर तोंड बंद होते.
मोठ्या हुद्द्यांवर असणारे साहेब लोक घरातील आनंदाच्या कार्यक्रमात कुलदैवताला भजल्याशिवाय राहत नाहीत.
वास्तूशांती हा प्रकार सर्हास सुरु आसतो.मग गृह्प्रवेशावेळेस सत्य नारायणाची महापूजा घातली जाते.
घरात सुखशांती लाभावी म्हणून नारायण नागबली सुद्धा करणारे आणी हजारो रुपये त्यात घालवणारे महाभाग या बौध्द धम्मात दिसतात.
बौद्ध धम्मात हिंसेला थारा नाही पण येथे मौसाहारी देवांना कोंबडी बकरीचा बळी दिला जातो.
विशेष म्हणजे सर्व सन इतक्या उत्साहाने साजरे केले जातात कि ,हिंदू लोकांनाही लाज वाटेल .
अजूनही गावच्या जत्रांना कोणी विसरले नाही.गम्मत म्हणून जाण्यास हरकत नाही .पण भक्ती भावाने जायलाच पाहिजे का?
यावर खूप मोठे उत्तर असते ,'मी नाही मानत हो पण माझ्या आईवडिलांसाठी करावे लागते,किंवा बायकोसाठी करावे लागते.'
उपासतापासातही हे लोक मागास नाहीत.अगदी निर्जळी उपवास सुद्धा पकडले जातात.
बालाजीला गेले तर केस दिल्याशिवाय येत नाहीत .साईबाबाच्या दर्शनासाठी वर्षातून एक वारी असतेच असते.
अनेकांच्या घरात देव्हारा असतो.प्रदर्शनी भागात नसेल तर आतल्या घरात नक्कीच असतो.
मोठ्या संखेने लोक आता हिंदू धर्माकडे आकर्षित होताना दिसत आहेत.
पुढील काही वर्षात बौद्ध धम्म पुन्हा एकदा लयास गेला तरी नवल वाटावयास नको.
कारण बौध्द धम्म महारांचा म्हणून इतर धर्मीय यात येत नाहीत आणि जे बौद्ध आहेत त्यांना हिंदू धर्माचे आकर्षण सुटत नाही.
मग पुन्हा चौथ्यांदा बौध्द धम्माचे पुनरुत्थान करण्यासाठी आणखी एका महामानवाला जन्म घ्यावा लागेल हेच खरे.

टीप:कृपया कट्टर बौद्धांनी मनाला लाऊन घेऊ नये.

कट्टर बौद्ध:
त्रिशरण पंचशील रोज म्हणतात,
कुठल्याच देवाला मानत नाहीत.अगदी कुलदैवताला सुद्धा,
जत्रेला गम्मत म्हणून जातात.
चागल्या कार्यक्रमात सत्यनारायण घालत नाहीत.
कुठल्याही चांगल्या कामाचे श्रेय स्वताला देतात; देवाला नाही.
मुलाबाळांवर बाबासाहेबांचे विचार रुजवतात.
घरात बाबासाहेब आणि बौद्धांशिवाय कोणता फोटो ठेवत नाहीत.

बौध्द धम्मातील मुले व मुलींची नावे

By Sidram Sakhare
बौद्ध धर्मातील मुलामुलींची नावे मुलींची नावे : अ – अमिता, आम्रपाली, अभिरुपनंदा, अभिरुपा, अनुपमा, अनुराधा, आरती, अरुणा, अलका, अर्चना, आनंदी, आज्ञाधारी, आज्ञा, अनुप्रिया, अनिता, अजंठा, आशा, अंजली, अंजना, अंनला, आर्या, आर्यकुमारी, अंजनी, अश्विनी, अस्तिमा, अनुजा, आकांक्षा, आर्श्वया, आतिमा, अंकिता, अंबत्तिका, अनुशीलता, अनुशीला, अनुसया, अमृता, अपर्णा, अंतिमा, अनंतश्वरी, अपराजीता, अनुजा, अक्षता, अक्षरा, आषाढी, अभिजिता, अनामिका. आ – आनंदी, आश्विनी, आनोमा, आश्वमेधा, अचिरावती, आम्रपाली, आढलेश, आशालता. क – करुणा, कमलशीला, कल्याणी, कल्पना, कामना, कुसुम, कुंडलकेशी, कुशीनरा, कुमारदेवी, कमल, कन्याकुमारी, कार्तिकी, कमलपुष्पा, कमलावती, कमलनयना, क्रांती,कांचन, किर्ती, किरण, कलावती, कंचन, कावेरी, कविता, कंचनलता, कांता, कनिष्ठा, कामिनी, कोमल, कक्षा, काजल, किसागौतमी, कौशल्या, कस्तुरी, कुददिपा, कपिला, कमलांक्षनी. ख – खेमा, खजुतरा. ग – गौतमी, गुणप्रिया, गुणवत्ता, गुणशीलता, गुणप्रभा, गुणरत्ना, गंगा, गुणलता, गिता, गितांजली, गौरी, गायत्री, गर्जना. च – चंद्रशीला, चंद्रप्रभा, चंद्रकिरण, चाला चित्रा, चारिका, चंपावली, चारुशीला, चेतना, चारुमती, चैताली, चंद्रकला, चंपा, चित्रलेखा, चमेली, चंदेरी, चंद्रा, चंद्ररत्ना, चंद्रदिपा, चंद्रमुखी, चंद्रकांता, चंद्राक्षनी, चंद्राक्षा. छ – छाया, छकुली, छब्बीता, छयेशा, छविना, छायाक्षी, छायांती. ज – जया, जल, जयललिता, जयश्री, जयेश्वरी, जयेश्वर्या, जेनकुमारी, जयेत जोत्स्ना, जयवंती, जानकी, जयशीला, जयाक्षनी, जयनंदनी, जयनंदा, जुही, जयकुमारी, जेतवन, जानवी, जागृती. त – तक्षशीला, तेजस्वीता, तृष्णा, तृप्ती, तारा तलीनी, तारिका, तेजस्विनी तिष्या, तिष्यांकामना, तिष्यरक्षिता. त्र – त्रिशीला, त्रिरश्मी, त्रिरत्ना, त्रिनेजा, त्रिनयना. द – दिक्षा, दर्शना, दानपुत्री, देवप्रिया, दंतिका, दामिनी, दिव्या, दिव्यांनी, दिव्यश्वरी, दिपा दिपीका, दिपरत्ना, दिपशीला, दिपाली, दिशा, दानपुत्री, दानपाली, देविना, देविका, दिपमाला, दक्षिना, दया, दर्पना, दिपशीला, दमयंती. ध – धम्मज्योती, धम्मदिना, धम्मपुत्री, धम्मप्रेमी, धम्मधिरा, धम्मशीला, धम्मप्रिया, धम्मनेत्री, धम्मसेनानी, धिरा, धम्मपाली, धनपुत्री, धनकुमारी, धनरत्ना, धनशीला, धम्मप्रेमिका, धम्मदिक्षा, धम्मांजली, धम्मश्वरी, धम्मप्रणाली, धम्मक्रांती, धम्मप्रेरणा, धम्माक्षनी, धम्मनंदा, धम्मकामना, धम्मदर्शना. ब – बुद्धप्रणाली, बुद्धपुत्री, बुद्धराणी, बुद्धलीला, बुद्धशाली, बुद्धरत्ना, बुद्धप्रभा, बुद्धांजली, बुद्धप्रिया, बाला. म – महामाया, मायावत, मायादेवी, ममता, मिरा, मिगारमाता, मृगनयनी, मिनाक्षी, मनिषा, मिना, मिता, महाराणी, मनोरमा, मालिनी, मुक्ता, मालती, मनोकामना, मैत्रायणी, मधुशीला, महानंदा, महानंदा, माधुरी, मंगल, मंजरी, मेघा, मेघगर्जना, माया, मधुवती, मधु, मधुबाला, मिनल, मानसी, मनाली, मंदा, मयुरी, मंजुशा, मंजिरी, मंजू, मोनिका, मेनका, मोहिनी, मौसमी, मंजुश्री, मित्तली, मेघना, माधवी, मायश्वरी, मायाक्षी, मधुरत्न, मणिरत्ना, मिक्रांती मयुरी. र – रोहिणी, रमा, रत्नमाला, रत्नपाली, रंजना, राजकुमारी, राजश्री, राजक्षी, रत्नदिपा, रागिणी, रविना, रिना, रेखा, रत्नसुंदरी, रत्नप्रभा, रत्नशीला, रक्षिता, रत्नज्योती, राखी, राणी, रिटा, रिता, रेणू, रक्षा, रिंकु रत्ना, रेश्मा, रितीका, राजनंदीनी. रु – रुपाणी, रमाई, रुपा, रुपमाला, रुपेर, रुपनंदा, रुशाली, रुशीता. ल – ललिता, लिली, लिला, लिलावती, लिलांकी, लिलाश्वरी, लिलकांती, लता, ललिन, लेखा, लिकिता, लुम्बिनी, लिलावती. न – नालंदा, नागराणी, निर्मला, नंदिनी, नागपुत्री, नंदकुमारी, निरंजना, नंदिनी, निलाक्षी, निलिमा, निलम, निलकुमारी, लकुलकुमारी, नायिका, निशा, निमा, निता, निकिता, निला, नेहा, नयना, नम्रता, निविदा, निलांबरी, निकांती, निलेश्वरी, निलांजनी, निलांजली, नंदा. प्र – पारमिता, पुनम, पुर्णा, पौर्णिमा, पुष्पा, पुष्पांजली, पुर्णिका, पद्मा, पद्मावती, पाली, पियुषा, पंचशीला, पिना, पारमी, पुजा, पुणिका, प्रेरणा, परिवर्तना. भ – भिमाई, भिमपुतरी, भिमकुमारी, भिमराणी, भिमज्योती, भिमस्मृती, भिमांजनी, भाविका, भावना, भाग्यश्री, भाग्यशाली, भागयरत्ना, भाग्यशीला, भाग्यवंती, भाग्यरती, भाविना. ऋ – ऋतुला, ऋतुशा, ऋताक्षी, ऋतुशीला, ऋतुशाली. वि – विशाखा, विद्या, विनयधारी, वैशाली, वजिरा, वाणी, विनीता, विजया, विजयानंदा, वैजंती, वैशाखी, विनायिका, वैश्यु, वनमाला, वंदा, विमल, वैभवशाली, विक्रमा, विक्रांती, विश्रांती, विक्रमशीला, विक्रमशाली, विनाक्षी, विपश्यना. श – शीला, शितल, संघप्रिया, सुवर्णा, सुवर्णमाला, सुमिता, सुनीता, सेमता, स्मृती, स्मिता, समाधी, संघनी, सुप्रभार, सुलक्षना, सुमित्रा, सायली, सत्यशीला, सत्यशाली, सुरेखा, सुनंदा, सुंगधा, सुशीला, सुमन, सरिता, सविता, सुषमा, सरोजा, सीमा, सरला, सरस्वती, साधना, संगीता, सया, संघदिपा, सुवासिनी, स्मृती, स्वाती, संजिवनी, सुलोचना, सुलाक्षी, स्वप्नाली, संचिता, संकिता, सांची, सम्राज्ञी, सुष्मिता, सुप्रणा, सुपर्णा, सदिच्छा, सारीका, सुश्रुषा, सुमनांजली, सुमेनांजनी, सुकिता, सती, सोनम, सोनाली, सोनेरी, सरोजिनी, सुहासिनी, सुकेशिनी. उ – उर्मिला, उरवेला, उरवेशा, उराक्षी, उर्मि, उत्तरा, उरमित, उषा, उमा, अत्पलवर्णा. मुलांची नावे अ – अभिमन्यु, अमितोधन, अपुर्व, अशिश, आदित्य, अरविंद, अंजन, असित, अजिंक्य, अजातशत्रु, अशोक, अजय, अनिरुद्ध अलंकार, आशुतोष, अंकुश, अमित, अमोल, अनिल, अविजित, आकाश, आयुपाल, अविनाश, अक्षय, अश्वजित, आरीरा, अमर, अगिरस, अग्निदत्त, आदेश, आनंद, अभय, अजित, अमेश, अमरेद्रकुमार, अमररत्न, अमृत, अमृताचंद, अश्वघोष, अहिंसक, आर्यनंद, आर्यसेन, आर्यनरेश, आर्यदेव, अजपाल, अजितसेन, आर्यनरेश, अश्वमेघ, आर्यपुत्र, आलामकालाम, आर्यमित्र, अंगीरस, आनंदकिर्ती, अमिताभ, अमरचंद्र, आनाथमित्र, आलोक, अश्वशील, अंगुलीमाल, आनाथपिण्डक, अर्हन्त, आवाहन, अलंकार, अशिश, आशुतोश, आदर्श, अमरदिप, अनंत, अंकित, अर्शद, ओंकार, अभिजीत, अभिनव, अंकुर, अबोध, अतूल. इ – इंद्रगुप्त, इद्रंदित्य, इंद्रजित, इंद्रसेन, इंद्रमित्र, इंद्रकुमार, इंद्रवर्धन. ग – गुणरत्न, गुणानंद, गुणसेन, गुणवर्धन, गुणवंत, गुणसागर, गुणानंत, गुणकुमार, गौतम, गौतमानंद, गौरव, गोवर्धन, गुलशन, गुरुधम्मा, गुणप्रभा. च – चक्रधर, चक्रवती, चंद्रगुप्त, चंद्रसेन, चंद्रराज, चंद्रमणी, चंद्रबोधी, चंद्रशेखर, चित्रसेन, चंद्रबंधु, चंद्रकांत, चंद्रशील, चैतन्य, चेतक, चेतन, चैत्यकुमार, चैत्यानंद. ज – ज्योतीपाल, जलपाल, जयानंद, जयप्रकाश, जयसेन, जयन, जीवक, जयवर्धन, जगन, जयमित्र, जयानंत, जयवंत, जितेश, जितेंद्र, जीवन, जय, जयरत्न, जयदिव, जेतनकुमार, जतिन, जयंत. त – तथागत, तुषार, तिष्यकुमार, तिष्यमित्र, तिष्यसेन, तिष्यानंद, तिष्यानंत, त्रिरत्न, तिस्स, त्रिनेत्र, त्रिदिप, तहंकर, तेजस, तेस, तेजस्वी, तिलोक. द – दानपाल, दानज्योतस, दानरत्न, दानदिप, दानवंत, दानसेन, दानवीर, दिपकर, देवदत्त, दंडपाणी, देवेंद्र, देवपाल, दानशुर, देवानंद, देविदास, देषप्रीय, दायक, दानप्रकाश, दानप्रिय, दानसागर, दानबोधी, दिपक, दिलीप, दिनकर, दिनेश, दर्पन, दर्शन. ध – धम्मसेवक, धम्मपाल, धम्मदुत, धम्मप्रकाश, धम्मशील, धम्मविनय, धम्ममित्र, धम्मज्योत, धम्मसागर, धम्मभुषण, धम्ममित्र, धम्मदर्शी, धम्मघोष, धम्मकिरण, धम्मपुत्र, धम्मानंद, धम्मनंत, धम्मरत्न, धम्मज्ञान, धम्मबोधी, धम्मकिती, धम्मधर, धम्मरक्षित, धम्मप्रिय, धरमेंद्र. न – नागासेन, नंदवर्धन, नंदसेन, नागवर्धन, नागानंद, नागार्जुन, नागेश, नंदेश, नंदकुमार, नरेश, नंदेश, नंदकुमार, नागधम्मो, नागदत्त, नागघोष, नागरत्न, नागबंध, नागप्रिय, नरेंद्र, नरसिंह, नोगपाल, नागराज, नागेंद्र, नंद, नरदत्त, नितीन, निलेश्वरा, निलकांत, निलकंठ, निलराज, निशिकांत, नविन, नवचैतन्य, निखिल, नलेंद्र, निलेंद्र, नयन, निलवंत, निवृत्ती. प्र – प्रियदर्शी, प्रसेनजित, प्रसन्नकुमार, प्रज्ञानंद, प्रज्ञावंत प्रशांत, प्रमोद, प्रज्ञापुत्र, प्रज्ञाकुमार, प्रदिप, प्रविण, प्रफुल्ल, प्रकाश, प्रल्हाद, प्रतिक, प्रभाकर, प्रमित, प्रमेश, प्रतिकार, प्रणालय, प्रताप, प्रभारत्न, प्राणज्योत, प्रज्ञानंद, प्रज्ञानंत, प्रज्ञारत्न, प्रेमानंद, प्रेमेपाल, प्रेम, प्रसाद, प्रितम, प्रियरत्न, प्रणीव, प्रणव. ब – बुद्धघोष, बुद्धप्रिय, बुद्धपाल, बोधानंद, बुद्धरत्न, बुद्धसंदेश, बोधीधम्म, बोधीपाल, बोधमृत, बालमित्र, बलभिम, बौद्धिक, बोधी, बुद्धादिप, बोधीप्रिय, बोधीराज, बुद्धसागर, बुद्धभुषण, बुद्धकिर्ती, बोधीसत्व, बोधीमित्र, बुद्धक्षित, बद्धांकु, बुद्धसेन, बुद्धपुत्र, बुद्धकुमार, बुद्धमान, बुद्धप्रणित, बुद्धशक्ती, बुद्धप्रकाश, बुद्धज्ञान, बुद्धज्योत. भ – भिमराव, भिमसेन, भिमदास, भिमपुत्र, भद्रसेन, भारद्वाज, भारत, भारतरत्न, भिष्म, भिमकुमार, भिमशक्ती, भिमप्रकाश, भिमवीर, भिमप्रिय, भिमज्योत, भिमरत्न, भिमशांत, भिमसागर, भिमानंद, भिमपाल, भिममित्र, भिमराज, भिमअमृत. म – मिलिंद, महेंद्र, महानाम, महादय, मंगलबोधी, मोगल्यायान, मणिकिर्ती, महाकारुणीक, महेश, महाकाश्यप, मंगेश, मंगलकिर्ती, मंगलराज, मुकेश, माणिक, मंगलराज, मणिरत्न, मोहन, मेत्तानंद, मितेश, मित्तकुमार, मोहर, मधुराज, मधुकर, मंगल, मकुल, मृणल, मधुर, मणेश, मनीष, मोहीन, मेघगर्जना, मेघानंद, मित्तल. य – रत्नदिप, रत्नबोधी, रत्नपाल, राजरत्न, रमेश, राजकिरण, राष्ट्रपाल, राजदत्त, राजेंद्र, राजेश, राजू, राजपुत्र, रेवत, रोहित, रोहन, रवि, रविंद्र, राज, राजमित्र, राजभूषण, राजपाल, राजानंद, रत्नकिर्ती, राजगृह, रागेश, रितेश, ऋतू, राकेश, रविराज, रविराज, रमाकांत, राहुल, रुपेश, रंधिर, रतन, रोनंक, राजन, रजनी, रजनिकांत, निशी, रोहिन, रंजित. व – विजयानंद, विकास, विनजय, विजयकुमार, विनायक, विभिषेक, विजेंद्र, विरेंद्र, विरेश, विनयबोधी, विमलकिर्ती, विमलसेन, वीरसेन, विनयवात्सलयान, विशुद्धांनद, विवेक, विद्यपाल, विलास, विनोद, विशांत, विद्यानंद, विनाश, विक्की, विरकुमार, विश्वदीप, विश्वरत्न, वैभव, विराट, विक्रांत, विधान, विक्रम, विनोद, विमलकुमार, वामन, विद्यारत्न. श – शरणानंद, शरणंकर, शांतीदुत, शांतीदुत, शांतीभद्र, शांतीरक्षित, शीतेश, शैलेश, शांतीशील, शांतीबोधी, शांतीप्रिय, शांतीपाल, शैलेंद्र, शुद्धोधन, शरद, शाक्यकुमार, शाक्यसिंह, शुभम, शशीकांत, शशी, शशीकुमार, शशांक, शिशुपाल, श्वेत, शिल्पकार, शत्रुघ्न, शालिक. स – सिद्धार्थ, सुमेध, सुमेधबोधी, सुप्रबुद्ध, सुदत्त, सुगत, सुधीर, सुरज, सुमित, सुकेश, सुयश सुमित्र, सुरज, सुनित, सुनिल, सुमंगल, सुबोधी, सुभद्र, सुशील, सुभद्रशील, सुभद्रबोधी, सुरेश, संचित, सुर्यसेन, सुविनय, सुजात, सुगतानंद, सविनाय, सुनानंद, संघरत्न, संघबोधी, संघबोधी, संघपाल, संघानंद, सिंहसेन, सिंहपुत्र, सिंहकुमार, सरनानंद, सत्यदर्शी, सत्यबोधी, सत्यपाल, सत्यदिप, सत्यानंद, सत्यरत्न, सावन, सावंत, सुबोध, सुधम्म, सुसंगत, सतिश, सदानंद, सचिन, सचेत, सारिपुत्र, संदेश, संदिप, सुर्यकांत, संघसेन, सधम्म, सदधम्म, संघमित्र, सुदामा, संग्राम, संघर्ष, सागर, संकेत, सोमेश, सुभाष, सुरेंद्र, सनी, सुर्यास्त, सुजान, सज्जन, सौरभ, सारनाथ, सिदेश, सिद्धांत, सुदिप, सुरत्न, संकेत. क – करुणानंद, करुणाकिर्ती, किर्तीपाल, कनिष्क, कंथक, कमलेश, कमलाकर, कल्पेश, कल्पक, किरण, किशोर, कौषिक, कपील, कुलदीप, कमलानंद, करण, करुणाकर, कुणाल, करुणादिप, करुणाबोधी, करुणारत्न, करुणावंत, कमलशिल, केतन. उ – उमेश, उत्पल, उरूण, उत्तर, उर्वेश.

मिस कॉल

मिस कॉल

दिवस उन्हाळ्याचे होते.सगळीकडे दुपारची शांतता होती.दुरून कोणी तरी एक पांढरी आकृती येताना सदाला दिसली.याच्या मनात कालवाकालव झाली.हा एक टाक लावून त्या आकृतीकडे पाहत राहिला.याच्या मनाची धुगधुगी वाढत चालली.आकृती जवळ जवळ यायला लागली.तसे सदाला जाणवले कि ती आकृती पुरुषाची असून तो पुरुष तरुण आहे.याला वाळवंटात मृगजळ दिसू लागले.त्याने जवळजवळ वर्षभर तरुण पुरुषाला पाहिले नव्हते .
आकृती जवळ जवळ यायला लागली आणि सदा जुन्या आठवणीमध्ये बुडून गेला.तो वर्षभर मागे गेला.
त्याला जसे कळायला लागले तसे तो मुलांपेक्षा मुलीमधेच जास्त वावरत होता.त्यांच्यातच खेळत होता.त्यांच्यासारखे कपडे घालण्याचा आग्रह धरत होता.त्यांच्यासारखेच हातवारे करत होता.त्यांच्या सारखेच होतो ला होते म्हणत होता.
भातुकलीच्या खेळत जास्त रमत होता.मुलींसारखीच वेणीफनी करत होता.लिपस्टिक लावून लाल झालेले ओठ मुलांना दाखवणे आणि त्याच ओठांनी त्यांना चिडवणे त्याला खूप आवडायचे.कानामध्येही कधीकधी वेगवेगळ्या प्रकारचे कानातले घालायला त्याला खूप आवडायचे.कानातले हलवत हलवत चालायला त्याला आवडायचे .चालताना कंबरेला बायकांसारखे किंचित हिंदोळे द्यायलाही आवडायचे.स्वभाव अतिशय नाजूक झाला होता.
सुरुवाती सुरुवातीला घरातले त्याचे लाड पुरवायचे म्हणून त्याला तो म्हणेल ते आणून द्यायचे पण नंतर जसजसा तो मोठा होऊ लागला तसे तसे घरातले चिंतीत होऊ लागले.याचे बायकी चाळे जास्तच होऊ लागले.तासनतास आरश्यासमोर बसून राहणे .येता जाता आरशात बघणे त्याचे वाढले.
तशी आई चिंतीत होऊ लागली.वडील काळजीत पडले.त्याचा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करू लागले.पण एकदा अंगवळणी पडले तर ते काय इतक्या लवकर सुटणार होते कि काय? उलट त्याच्या आयुषाने वेगळेच वळण घेतले.
तो पाचवीत असताना आठवी नववितली मुले त्याला मुद्दाम चीटकायला लागली .त्याचे मागे पुढे फिरू लागली.त्याला गोळ्या चोकलेट देऊ लागली.त्याच सोबत करू लागली.गोळ्या चोकलेट च्या बदल्यात त्याचे गळ ओढणे.त्याची कोवळी छाती दाबणे .आपल्या लिंगावर हात ठेवणे असे कृत्य करू लागली.हळू हळू त्यालाही ते आवडू लागले.
आता तो मुलींमध्ये खेळण्याऐवजी मुलांमध्ये रमायला लागला.त्यातल्या त्यात जी मुले त्याच्या अंगाशी खेळत आणि स्वतःच्या अंगाशी त्याला खेळवत, अशी मुले त्याला जास्त आवडायला लागली .तो त्यांच्यातच रमू लागला .
जसजसा तो मोठा होत होता.मुले त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करायला लागले.सुरुवातीला त्याला त्रास होऊ लागला पण नंतर नंतर त्याला तो खेळ आवडायला लागला.मग तो खेळ रोजचाच होऊ लागला.फक्त भिडू बदलू लागले.मग कधी शाळेच्या पाठीमागे कधी शेतात.कधी घरात.कधी गच्चीत.कधी झाडामागे कधी अंधारात कधी उजेडात.वाटेल तेथे वाटेल तेंव्हा.गावातील कुठलाच कोपरा त्याने मोकळा ठेवला नव्हता.त्याच्या मागे सतत मुलांचे लेंढार असायचे.त्याचे दिवस मजेत जात होते.म्हणजे रोजचाच दिवस मजेत जात होता.रोज नवीन अनुभव त्याला मिळत होता.एखाद्या दिवशी कोणी भेटले नाही तर त्याला त्याचा जीव खायला उठायचा.तो दिवस अगदी बेचैनीत जायचा.त्याला त्या दिवशी झोपही लागत नसे.अख्खी रात्र तळमळत काढावी लागे.त्याला मुलांची खूपच सवय लागली होती.
आता तो पंधरा वर्षांचा झाला होता.दिवस मजेत जात होते आणि एक दिवस लातूरला भूकंप झाला.संपूर्ण भारतात खळबळ उडाली .

लातूरला बसलेल्या भूकंपाचा परिणाम खूप दूरवर झाला होता.लातूरमधील घरे आणि संसार उध्वस्थ झालेच पण त्याच वेळेस त्या परिसराच्या जवळपास असनाऱ्या गावांना आणि शहरानाही धक्का बसलाच होता.त्याचा परिणाम जन जीवनावर झाला होता.बरीच घरे उद्वस्थ झाली होती.रोजगार बुडाला होता.होत्याचे नव्हते झाले होते.अमीर कंगाल झाला होता.पंचक्रोशीत कुठेच रोजगार राहिला नव्हता.बरेच लोक भूकंपात झोपेतच वर गेले होते.प्रत्येकजण कंगाल झाला होता.त्यामुळे कुणाला कुणाची सहानुभूती राहिली नव्हती.जो तो स्वार्थी झाला होता.आपण भले आणि आपले कुटुंब भले अशी ज्याची त्याची परिस्थिती होती.जे वाचले होते.त्यांनी आपली घरे सावरली होती.म्हाताऱ्याना घरी सोडून तरणे ताठे रोजगारासाठी मिळेल त्या शहरात गेले होते.गावाची खूप रया झाली होती.
असेच दुखः जवळच असलेल्या पतुरणे गावावर आले होते.सर्व तरुण रोजगार मिळवण्यासाठी मिळेल त्या शहरात पायाला भिंगरी बांधून काम करत होते.सुरुवातीला फक्त पुरुष मंडळी गेली नंतर त्यांना जेंव्हा रोजगार मिळाला तेंव्हा आपापल्या कुटुंबाला बोलावून घेतले.पण गावाची हालत इतकी खराब होती कि ,प्रत्येकाने काम केले तरच ती स्थिर स्थावर होऊ शकत होती.त्यामुळे गावातील लहान थोर शहराकडे पळाला होता.फक्त म्हातारे लोक तेव्हडे उरले सुरले सांभाळायला मागे राहिले होते.हळू हळू सगळे व्यवस्थित व्हायला लागले .शहरात कामाला गलेले लोक म्हाताऱ्याना आणि ज्या काही महिला उरल्या होत्या त्यांना पैसे पाठवून त्याचे उरले सुरले जीवन जगवण्याचा प्रयत्न करू लागले .
भूकंप होऊन जवळ जवळ एक वर्ष होत आले होते.
सगळे सुरळीत होत चालले होते.पुन्हा गावात आनंद यायला लागला होता.
सर्व आनंदित दिसत होते.शहरात गेलेले शहरातच स्थायिक होण्याच्या बेतात दिसत होते..गावापेक्षा त्यांना तिकडे जास्त पैसे मिळत होते.सुविधा जास्त मिळत होत्या.मनोरंजनाची साधने मुबलक होती.त्यामुळे त्यांची मुलेही तिथून पाय काढायला धजत नव्हती.
सर्व सुरळीत झाले असले तरी.सदाच्या जीवनात जी पडझड झाली ती कायमचीच.त्याचे जीवन आता असेच अळणी जाते कि काय असे त्याला वाटत होते,आई तो दिवसेंदिवस झुरत होता.गेल्या वर्षभरापासून त्याला तरुण पुरुषाचा हात लागला नव्हता.त्यासाठी त्याचे संपूर्ण शरीर आसुसलेले होते.पण गावात सगळे म्हातारे लोक होते.कोण त्याची इच्छा पूर्ण करणार? आलेला दिवस कसातरी ढकलत होता.कधीतरी सर्व गावात येतील अशी त्याला आशा होती.त्याच आशेवर तो जगत होता.कधी तरी कोणी तरी येईल आणि आपली इच्छा पूर्ण करेल याची तो वाट पाहत होता.आणि आज त्याची इच्छा पूर्ण होताना दिसत होती.
ती पांढरी आकृती जवळ जवळ आली तशी याच्या शरीरात चलबिचल झाली .अंगात शहारे यायला लागले.काहीतरी होतेय अशी अनुभूती व्हायला लागली.
पांढऱ्या कपड्यांमध्ये असलेला तरुण जवळ आला तेंव्हा तेंव्हा सदा त्याच्या कडे पाहतच राहिला.अतिशय सुंदर .गोरागोमटा तरुण त्याने पहिल्यांदाच पाहिला होता.त्याचा गावात इतका सुंदर मुलगा नव्हताच कधी.तो जवळ आला.आणि सदाला नमस्कार करून तो बसला होता त्या गावाच्या बाहेर असलेल्या पिंपळाच्या पारावर बसला.तेथून गाव अजून एक कोस दूर होते.आलेली व्यक्ती त्याच्या गावात पाहुनी होती.त्या व्यक्तीने आल्या आल्या सदाला नमस्कार केला.सदानेही त्याला नमस्कार केला
पाहुणा थकलेला होता.बराच चालला होता.एक ता उन्हाचे दिवस .त्यात चालणे खूप झाले होते.त्याला तहान लागली होती.सदाणे त्याला पाणी प्यायला दिले .त्याचा दम हळू हळू स्थिर झाला .त्याने दम खाण्यासाठी मागे हात टेकून पाय पुढे रेटले.हातातील ब्याग बाजूला ठेवली .त्याने मागे हात टेकलेला पाहून सदाने संधीचा फायदा घेतला.आणि त्यानेही मागे हात टेकले. हळू हळू सदाचा हात पाहुण्याच्या जवळ आला.त्याची बोटे हळू हळू पाहुण्याच्या बोटाजवळ आली आणि बोटांवरून फिरू लागली.तशी पाहुण्याने मिटलेले डोळे उघडले.आपल्या हाताकडे पाहिले आणि आणि पुन्हा डोळे मिटून घेतले.सदाचा हात आता सराईतपणे चालू लागला.पाहुणाही त्याला रीस्पोंस देऊ लागला.हळू हळू त्याचा हात पाहुण्याच्या हातात आला.दोघेही तितक्याच आवेगाने एकमेकांचे हात दाबू लागले.दोघेही घामाघूम झाले. दाट सावली असूनही दोघेही घामाघूम झाले.
ते ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी लोक येणे श्यक्यच नव्हते.एक तर दुपारची वेळ उन तापलेले आणि ती जागा आडवळणाची .
थोड्याच वेळात दोघही एकमेकाच्या मिठीत गेले.एक वर्षानंतर सदाची भूक मिटणार होती.तो खूप आनंदित होता.त्याचा तो आनंद या पूर्वी त्याला कधीही मिळाला नव्हता.तो स्वतःला खूप धन्य समजत होता.आज त्याच्या नशिबाने पूर्वीचे दिवस आणले होते.त्याची प्रतीक्षा संपली होती.
त्याला आता जास्त राहवत नव्हते.तो पाहुण्याच्या मिठीतून मुक्त झाला आणि भरभर कपडे काढले .पाहुण्याकडे पाठ करून ओणवा झाला ,त्याच वेळेस पाहुण्यानीही कपडे काढलेदोघेही घाई वर आले होते.सदा तिकडे तोंड करून डोळे लावून पाहुण्याची वाट पाहत स्वप्नामध्ये गुंगला होता.एक मिनिट झाले दोन मिनिट झाले पाच मिनिट झाले पण पाहुण्याची काही हालचाल दिसेना.सदाचा हिरमोड झाला .त्याने डोळे उघडले .पाठमोरे पाहिले आणि डोक्यावर हात मारून घेतला.पाहुणाही त्याच्याकडे पाठ करून ओणवा होता.

प्रेम काय असत ग ?

प्रेम काय असत ग ?

'ये स्मिता ,खरच का ग कुमार माझ्यावर प्रेम करतो.'' सविताने स्मिताला भाबडेपणाने विचारले.
'मला नाही माहित ग ,करीना म्हणत होती.' स्मिता.
'पण तिला कोणी सांगितले?"सविता
'' त्यानेच सांगितले असेल ग ''
पण तो कशाला तिला सांगेल? प्रेम माझ्यावर करतो आणि करीनाला कशाला सांगेल? त्याने मलाच सांगायला काय झाले होते?" 
''हो ग, पण तो तुला घाबरला असेल.'
'प्रेम करतो ना,मग कशाला घाबरतो मला तो ?''
''आता मला काय माहित? मला वाटले म्हणून बोलले मी.''
''काय ग , प्रेम करतो म्हणजे काय करतो ग ?"
'' मला नाही माहित ग,मी निंही पाहिले कुणाला प्रेम करताना ''
''अग,तो माझ्या घराजवळून नेहमी चकरा मारतो,माझ्या घराकडे बघत असतो.परवा मला माझ्या लहान भावाने पण सांगितले.तो काल बराचवेळ तिथे उभा होता .'
'अग,त्याचे काही काम असेल .'
'नाही ग,तो मुद्दामच माझ्या घराकडे येतो,कधी कधी ना ते लिंबाचे झाड आहे ना ?''
''कोणते ग '
'अग ते नाही का त्या टपरीच्या बाजूला,सुनीताच्या घराकडे जाताना?' 
'अच्छा ,ते?'
हो .तेच.तेथेच उभा होता म्हणे काल खूप वेळ.'
कशाला उभा होता ग?'
'आता मला काय माहित?"
अग,तुझ्यासाठीच असेल मग?"
असे कशाला उभे राहतो? माझ्याकडे काही काम असेल तर मग त्याने सांगावे ना,जमेल तर करेन नाहीतर नाही सांगेन.'
'होग, त्याने सांगायला काय हरकत आहे.मूर्खच आहे .'
'नाही तर काय?'पण काय ग सांग ना प्रेम म्हणजे काय ?'
अग,खरेच मला नाही माहित.मला वाटते.तो जे करतो ना.तेच प्रेम असते.''
'म्हणजे माझ्या घराजवळ चकरा मारतो ते प्रेम असते? तो माझ्यासाठी माझ्या घराजवळ बघत थांबतो ,ते प्रेम असते?'
'थांब ह,ती बघ संगीता येते आहे. तिला माहित असेल प्रेम म्हणजे काय आहे ते .मी तिलाच विचारते.''
''नको ग .ती काय म्हणेल ?"
''त्यात काय विशेष ? ती करते ना प्रेम ? मग आपल्यालाही प्रेम काय असते ते सांगेल ना?'
''नको बाबा मला भीती वाटते .भलतं सलतं काही असलं तर मला माझे वडील घरात नाही घेणार .''
''नाही ग तसे काही नसणार .थांब ती आली बघ ,तिलाच विचारते.काय ग संगीता,कुठे गेली होतीस?''
'काही नाही ग ,पिक्चरला गेली होती.''संगीता 
'एकटीच?'सविता
'नाही ग,चैतन्य होता ना बरोबर.'' संगीता 
''चैतन्य रायभोळे ?"स्मिता
'हो तोच .'संगीता
'मग त्याच्याबरोबर का गेलीस ? मैत्रिणी नव्हत्या का? घरच्यांबरोबर जायचे ना?' स्मिता.
'मग त्याच्याबरोबर गेले तर काय झाले? तो माझा मित्र आहे .मी त्याच्यावर प्रेम करते?'संगीता 
'काय ग प्रेम करते ग ?"सविता.
'अग,प्रेम करतो म्हणजे तो मला आवडतो मी त्याला आवडते.आणि मग त्याच्याबरोबर पिक्चरला गेले तर काय हरकत आहे ?"संगीता
'काग ,घरच्यांनी पाहिले तर तुला रागावणार नाहीत का?"सविता 
'घरच्यांना कळेल तेंव्हा ना? 'संगीता
'मग आज तू पिक्चरला गेली होती ,ते घरी सांगून गेली होती का?'स्मिता.
'अग तू पागल आहेस का? घरी सांगून कोणी जाते का ?'संगीता
'मग तू कशी काय गेलीस?"सविता 
'अग मी मनीषाबरोबर जाते आहे असे सांगून गेली होती.'संगीता
'म्हणजे तू खोटं बोलून गेलीस?'स्मिता
'मग खोटच बोलावे लागते.कोणी सोडणार आहे का आपल्याला असे कोणाबरोबर?"संगीता
'अग,तूच तर आता म्हणाली होतीस ना ? कि तुम्ही एकमेकांवर प्रेम करता म्हणून.''सविता 
'हो मग काय असे जगाला दाखवत बसायचे का?"संगीता
'काय ग ,आता तर संध्याकाळ आहे,मग तू स्कार्फने पूर्ण तोंड का बांधून घेतले आहेस?"स्मिता
'अग, कोणी पाहिले मग?'हि बरी सोय असते.''संगीता
'म्हणजे प्रेम चोरून चोरून करायचे असते का?"सविता.
'जोपर्यंत सगळ्यांना माहित होत नाही तोपर्यंत चोरून चोरूनच करायला लागते.'संगीता
'आणि नाही केले तर ?"सविता
'ते आपल्यावर आहे करायचे तर करा नाही करायचे तर नका करू .कोणी जबरदस्ती केली आहे.''संगीता 
'काय ग ,एखादा मुलगा आपल्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो ग ?"स्मिता
'अग,तो सुरुवातीला आपल्याकडे सारखे बघत बसतो.आपल्या रस्त्यावर आडवा येतो,उगीच आपल्या मागे रेंगाळतो,आपण क्लास लावला तेथेच क्लास लावतो.आपल्यासाठी शाळेत येतो.वर्गात असेल तर सारखा बघत असतो ,चिठ्ठी लिहितो.आपल्या मैत्रिणीला सांगायला सांगतो,मुद्दाम बोलायला बघतो.'संगीता
'मग आपण त्याच्याशी नाही बोललो तर? त्याच्याकडे नाही पाहिले तर? ''स्मिता
'तर काही नाही.तो त्याचे काम करतो आपण आपले काम करत राहायचे .आपला अभ्यास करत राहायचा.त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही.''संगीता
'पण तो सारखाच बघत असेल? मागे मागे येत असेल .घराजवळ चकरा मारत असेल तर?"स्मिता
'जर त्रास देत असेल तर सरांना किंवा madam ना नाव सांगणे नाहीतर आईला सांगणे.पण कधीच दुसऱ्या मुलांना सांगू नये.'संगीता
'काग?'सविता 
'अग,त्यांची भांडणे होतात, मारामाऱ्या होतात.मग चर्चा होतात.आपले नाव बदनाम होते.आपल्या आईवडिलांची बदनामी होते.मग घरगुती भांडणे होतात. त्या मुलाला जास्त मार बसला असेल तर तो मग आपल्याला आणखी त्रास देऊ शकतो,रस्त्यात अडवू शकतो.काग,अश्या काय विचारताय ? कोणाच्या प्रेमात पडलात कि काय?"संगीता
'नाही ग 'स्मिता,सविता
'मग एकदम असे काय विचारताय ?"संगीता
'सहज विचारले .'स्मिता'
'सहज कसे काय विचारले?"संगीता
'एक मुलगा आहे ना ,आमच्या शाळेतला तो आमच्या एका मैत्रिणीच्या मागे लागला आहे .तो म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो .'स्मिता
'अग,तुमची वय काय आहेत? तुम्ही आताशी सातवीत आहात.तुम्हाला कशाला हवे प्रेमबीम ? चांगला अभ्यास करायचा.आईबापाचे नाव कमवायचे.स्वतःचे करियर बनवायचे .चांगले शिकायचे.नोकरी करायची.साहेब व्हायचे.मग आईबापाच्या संमतीने चांगल्या मुलाशी लग्न करायचे .आणि मग त्याचेवर प्रेम करायचे अगदी मरेपर्यंत .या टीवी सिरीअलच्या नादी नाही लागायचे,पिक्चरमध्ये दाखवतात त्यांच्या नदी नाही लागायचे.ते सगळे खोटे असते.असे होत नाही.आणि होतही असेल तर आपण तसे करायलाच पाहिजे का?"संगीता
'नाही.'स्मिता,सविता
'हुशार आहात हो दोघी .कुठे चालल्या आहात?'संगीता
'कुठे नाही.क्लासवरून आलो घरी चाललो आहोत.'स्मिता
'ठीक आहे .चलते मी 'संगीता
'बर झाले ग सांगितला विचारले .नाहीतर माझे काही खरे नव्हते.'सविता
'हो ,बघितले ना? स्वतः करते आणि आपल्याला नाही म्हणते.'स्मिता
'नाही ग, ती बरोबरच बोलली आहे .तिला अनुभव आला असेल ना?"सविता
'मग आपण नाही घ्यायचा अनुभव?"स्मिता'
'घ्यायचा ना.पण लग्नानंतर 'सविता
'चल जाऊदे ते प्रेमबीम .उद्यापासून त्या कुमार कडे बघू नकोस.मारू दे त्याला किती चक्र मारायच्या आहेत त्या.जाईल कंटाळून आणि मग देईल नाद सोडून.'स्मिता
'हो तसेच करते.पण तू माझ्या सोबत राहत जा .'सविता
'तुझ्याच सोबत आहे बाई ,घाबरतेस काय वेळ आली तर घरीपण सांगून टाकूया .'स्मिता
'हो हो चल घरी ,उशीर झाला आहे.'सविता .
'चल,प्रेमाला बाय बाय .'

विद्रोहाचा सूर्य मावळला


विद्रोहाचा सूर्य मावळला

(सुर्योदय १५ फेब्रुवारी १९४९-सूर्यास्त १५ जानेवारी २०१४ )

'जीवन म्हणजे दोन मांड्यातून येणे
आणि चार खांद्यांवरून जाणे'

मला कळायला लागले तेंव्हा लढाऊ संघटना म्हणून दलित प्यान्थर हि नावारूपाला आलेली जहाल संघटना होती.या संघटनेचे तरुणांना मोठे अप्रूप होते.त्यात मीही होतो.
राजकीय जीवनाला सुरुवात करताना सुरुवातीला दलित प्यान्थर या सामाजिक संघटनेने मला रस्ता दाखवला.
प्यान्थरने आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे मी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.
पद्मश्री नामदेव ढसाळ साहेब,अरुण कांबळे सर,मा.रामदास आठवले,भाई संगारे,गंगाधर गाडे या नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी आम्ही खूप पायपीट करून जात होतो.
सर्वच नेते जहाल भाषणे करून तरुणांची मने पेटवत होती.
प्यान्थरकी स्थापनाच मुळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या विरोधात झाली आहे.कारण रिपाईचे नेते कॉंग्रेसला मदत करत होते.त्याच्या विरोधात प्यान्थरने तरून हि संघटना उभी केली.आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रात हि जहाल संघटना पोचली.नामांतर चळवळ या संघटनेने उचलून धरली.
शिवसेनेला रोखण्याचे काम प्यान्थरने केले.
हि संघटना उभी करण्यात पद्मश्री नामदेव ढसाळ,ज वी पवार, राजा ढाले,अरुण कांबळे ,भाई संगारे यांचे मोठे योगदान आहे.
 पद्मश्री नामदेव  ढसाळ हे जरी प्यान्थरचे संस्थापक असले तरी त्यांनीच हि संघटना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.कारण या संघटनेच्या नावावर काही तरुण लोकांची फसवणूक करत होते.तेच त्यांना आवडले नाही.मग त्यांनी मास मुव्ह्मेंटची स्थापना केली.आणि ती संघटना चालवली.
दलित प्यान्थर ची कल्पना नामदेव ढसाळ व ज वी पवार यांना अमेरिकेच्या ब्ल्याक प्यान्थर या संघटनेवरून सुचली. आणी त्यांनी ती लढाऊ संघटना १९७२ मध्ये उभी केली.आणि थोडयाच दिवसात ती नावारूपाला आणली.
पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी चळवळीबरोबरच सामाजिक भानही ठेवले.त्यांनी त्यांचा विद्रोह चळवळीतून जसा दाखवला तसाच तो कवितेतुनही दाखवला. ते जागतिक कीर्तीचे कवी होते. त्यांच्या सानिध्यात येण्यासाठी जगभरातील कवी धडपड करायचे .
त्यांचा आडदांड देहच समोरच्याच्या मनात धडकी भरवायचा.
जसे ते मोठे नेते म्हणून नावारूपाला आले तसेच ते एक जागतिक कवी  म्हणून नावारूपाला आले .आज संपूर्ण जग त्यांच्या अस्ताने अंधारात गेले आहे..
पद्मश्री नामदेव ढसाळ हे अवघ्या ६४ व्या वर्षी अनंतात विलीन झाले आहेत.
पण त्यांनी निर्माण केलेले साहित्य सतत आम्हाला प्रेरणा देत राहिल.त्यांचे बालपण अतिशय हलाखीचे गेले.त्यांचा जन्म पुण्यातील एका गावात झाला असला तरी त्यांचे बरेचसे आयुष्य मुंबईतील गोलपिठा येथे गेले .त्यांनी काही काल ट्यांक्षी हि चालवली.
त्यांनी १९७३ मध्ये गोलपिठा हा धगधगीत  कविता संग्रह प्रशिध्द करून एकच खळबळ उडवून दिली.त्यांनी नवनवीन शब्द साहित्याला दिले आहेत.
गोलपिठा बरोबरच तुही यत्ता कोणची?,खेळ,प्रिय दर्शनी,या सत्तेत जीव रमत नाहीत,गांडू बगीचा,मी मारले सूर्याच्या रथाचे सात घोडे,तुझे बोट धरून मी चाललो आहे, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवला.त्याच बरोबर आंबेडकरी चळवळ,आंधळे शतक,हाडळी हाडवळा,उजेडाची काळी दुनिया,सर्व काही समस्टीसाठी ,बुद्ध धम्म-काही शेष प्रश्न.या सारखे साहित्य त्यांनी लिहिले आहे.
त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार मिळाला आहे त्याच बरोबर सोव्हियत ल्यांड नेहरू अवार्ड (गोलपिठा साठी १९७४) १९९९ मध्ये साहित्यासाठी पद्मश्री मिळाले,२००४ मध्ये गोल्डन लाइफ टाईम अचीवमेंट साहित्य अकादमीने दिला.
नामदेव ढसाळ यांनी  मध्यंतरी शिवसेनेबरोबर समजोता केला होता. पण त्यांना शिवसेनेने त्यांना न्याय दिला नाही.सेनेच्या सामना या वृत्तपत्रात ते दर शनिवारी  'सर्व काही समस्टीसाठी' हे सदर लिहित होते.त्यातून त्यांनी बरेच नवीन शब्द साहित्याला दिले आहेत.ते खूप चांगले वाचक होते.
त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्यांनी योगदान दिले त्या शाहीर अमर शेख यांची मुलगी मल्लिका यांच्या बरोबर त्यांचा विवाह झाला होता.
मल्लिका यांनी 'मला उध्वस्त व्हायचेय'या नावाने आत्मकथा लिहून खळबळ उडवून दिली होती.नामदेव ढसाळ हे माणुसकी जपणारे होते.
एक घटना आठवते .मा.आमदार रिपब्लिकन नेते गायकवाड यांच्या मुलाचे लग्न दादर येथे हिंदू कॉलनीत होते .मा.नामदेव ढसाळ हे दवाखान्यात होते.पण मा. गायकवाड यांच्या मुलाचे लग्न होते म्हणून ते दवाखान्यातून हॉलच्या  गेट पर्यंत व्हील चेअर वर आले होते .आम्ही त्यांना भेटायला गेलो.त्यांचा आशीर्वाद घेतला .तेंव्हा सुमन्त गायकवाड यांच्या पत्नींना  खूप आनंद झाला होता.'आजारी असतानाही माझ्या मुलाला आशीर्वाद द्यायला तो आला असे त्या  त्या आम्हाला सांगत होत्या .नामदेव आणि मी एका वर्गात होतो.मी त्याला भाऊ मानला आहे .तो भलेही गेट पर्यंत आला असला तरी मला खूप आनंद झाला आहे .'
आमच्यात नसलेल्या पण आम्हाला सतत रस्ता दाखवणाऱ्या योग्य मार्ग दाखणाऱ्या पद्मश्री नामदेव ढसाळ  यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन .

Friday, 6 December 2013

अभिवादन करण्यापूर्वी.....


आज डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा ५७ वा महापरीनिर्वान दिवस आहे .आज चैत्यभूमी,दादर येथे,लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी येणार.फक्त महाराष्ट्रामधूनच नाही तर संपूर्ण भारतातून येणार.बाबासाहेबांचा देह जिथे महासागराच्या साक्षीने विसर्जित केला गेला तिथे नतमस्तक होणार.आजच्या दिवशी एक नवीन चैतन्य भीम अनुयायांमध्ये संचारणार

भीम अनुयायायंचे जथे च्या जथे चैत्यभूमीवर येणार.बाबासाहेबांना अभिवादन करणार.आपल्या समजाच्या लाखोंच्या दर्शनाने प्रभावित होणार.मग जातायेताना चर्चा रंगणार.'आपला समाज इतका मोठा आहे .या समाजासारखा मोठा समाज कुणाचा नाही.मग तरीही आपण राजकारणात मागे का? आपण सगळे वेगवेगळ्या गटात वाटले गेलो म्हणून आपण मागे आहोत.आपण जर एक असतो ना तर काय कुणाची बिशाद होती आपल्याला हरवायची .आणि आपण सत्ताधारी झालो असतो.आपला मुख्यमंत्री असता.आणि त्याच्याही पुढे जाऊन कुणी म्हणेल आपला पंतप्रधान असता.आपले नेतेच स्वार्थी आहेत ते फक्त स्वताचा स्वार्थ बघतात .आणि स्वतःची खासदारकी आणि आमदारकी टिकवण्यासाठी इतर पक्षांच्या मागे लाचारासारखे  स्वतः जातात.आणि समाजालाही घेऊन जातात.मग कुणी म्हणेल आपल्या समाजात लोक किती शिकले आहेत.हि बाबासाहेबांची पुण्याई आहे.बाबासाहेब नसते तर आपण आजही घाण कामे करत बसलो असतो.कुत्र्यामांजरा सारखे जीवन जगत असतो.आपल्याला कवडीची किंमत नसती.आणि लाचारीचे जगणे नशिबी आले असते.अन बाबासाहेबांमुळे आपण आज सन्मानाने जगत  आहोत.चर्चा चर्चा आणि चर्चा बस्स.याशिवाय आपण करू तरी काय शकतो?

चर्चेमध्ये आपला हात कोणी धरू शकत नाहीत.इतर समाजांमध्ये कार्यकर्ता लवकर होत नाहीतआर नेता कुठे होणार? ;पण आपल्या समाजात  घराघरात नेता असतो.बाबासाहेब म्हणाले होते,' सत्ताधारी जमात बना.'आपण खूप सिरीअसली घेतले आणि घराघरात नेते जन्माला.आले.प्रत्येक जन जन्मताच मोठा असतो .कोणी कोणाचे ऐकण्याच्या फंदात पडत नाही.प्रत्येक जन आपल्या मर्जीचा मालक असतो.ज्याच्या मनाला वाटेल तसा तो जगात असतो. त्याच्या जगण्याला दिशा नसते.तो कुठेही भरकटत जातो.आणि आपल्या समाजालाही स्वताबरोबर भरकटत नेतो.समाजही मेंढ्याच्या जातीचा बनला आहे,एक चालला कि दुसरा त्याच्यामागे जातो.कुठे चालला आहे.? का चालला आहे? आपला काही फायदा आहे का? काही विचार न करता अंधाप्रमाणे त्याच्या खांद्यावर हात ठेवून जात असतो.

आज बाबासाहेबांचे महापारीनिर्वान होऊन ५७ वर्ष होतायेत.आपण दरवर्षी चैत्यभूमीवर मोठ्या संखेने एकत्र येतो याशिवाय  आपण बाबासाहेबांना काय दिले याचा कधी आपण विचार केला आहे का? बाबासाहेबांनी आपल्याला चार संस्था दिल्या आहेत .राजकारणासाठी  'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' .धार्मिक कार्यासाठी 'भारतीय बौद्ध महासभा',शैक्षणिक कार्यासाठी 'पीपल्स एजुकेशन सोसायटी ',आणि समाजाच्या संरक्षणासाठी 'समता सैनिक दल.' या चारही संस्थांचा आढावा घेतला आहे का कधी?

कोणत्या टप्प्यावर आहेत त्या आज? किती पुढार्यांनी किंवा समाजातील सधन लोकांनी शैक्षणिक संस्था काढल्या आहेत.कि ज्यातून बाबासाहेबांचा समाज शिकतो आहे.? किती लोक भारतीय बौद्ध महासभेचे सभासद आहेत? किती लोंकांना समता सैनिक दल माहित आहे? जास्त समाज हा राजकारणातच रममाण झालेला दिसतो.पण निम्यापेक्षा समाज हा इतर पक्षांचे झेंडे खांद्यावर घेण्यातच धन्यता मानताना दिसतो .मग ते कॉंग्रेसमध्ये दिसतील,राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये दिसतील,शिवसेनेत दिसतील,मनसेत दिसतील. बीएसपीत दिसतील.पण बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचे काय? बाबासाहेबांनी समाजाच्या उत्कर्षासाठी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना ठेवली होती.

रिपब्लिकन पक्षाच्या झेंड्याखाली समाजाने एक होणे आणि त्या बरोबर इतर समाजालाही एकत्र करणे हा बाबासाहेबांचा हेतू होता.पण इतर समाजाचे सोडाच पण बाबासाहेबांचा अनुयायी असणारा समाजही बाबासाहेबांच्या संकल्पनेतील पक्षात राहू शकला नाही. इतर पक्षाचे झेंडे उचलण्यात आणि त्यांना मोठे करण्यातच आपण धन्यता मानली.आणि आपण केलेल्या कामगिरीचे बक्षीस म्हणून एखादी आमदारकी,एखादी खासदारकी मिळण्यासाठी त्याच्या दारात चकरा मारू लागलो.प्रत्येकजण आपापल्या परीने त्यांचे पदरात काही ना काही पाडून घेण्याच्या इर्षेत समाजाचे काय हाल झाले याचे भान विसरला.आज इतर समाज जाऊ द्या पण बाबासाहेबांना मानणारे  ,बाबासाहेबांचे अनुयायी जरी एकत्र आले.आणि एकविचाराने निवडणुकीला सामोरे गेले.तरी सत्ता ताब्यात घेऊ शकले नाहीत तरी सत्तेची चावी स्वताकडे ठेवू शकतात.हे बीएसपीने उत्तरप्रदेश मध्ये दाखुवून दिले आहे.जे बीएसपीला जमले ते रिपब्लिकनला जमू नये का? कालचा मनसे एका फटक्यात १३ आमदार निवडून आणतो.आणि पक्षाला स्वतःचे चिन्ह मिळवतो.पण आम्हाला ५७ वर्षात हे करता आले नाही .

त्या पक्षात आपले लोक मोठ्या संखेने आहेत हे जरी मान्य असले तरी ते त्या पक्षात का गेले याचा विचार आपण करणार आहोत कि नाही? आपल्या लोकांना एका झेंड्याखाली खेचण्याचा आपल्याला प्रयत्न करावा वाटत नाही हेच मोठे दुख आहे.

धार्मिक बाबतीत पाहिले तर बाबासाहेबांनी विषमता निर्माण करणारा ,माणसामाणसामध्ये तेढ निर्माण करणारा हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारला .बाबासाहेबांनी आपल्याला हिंदू धर्माच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी २२ प्रतिज्ञा दिल्या .त्यातील एक प्रतिज्ञा आहे ,'मी गौरी गणपती ,दुर्गापूजा हे सन साजरे करणार नाही.'पण आजचे चित्र काय आहे ? तर जे लोक शिकले आहेत ते गौरी गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करताना दिसतात.आपण हिंदू महार होतो तेंव्हा गणतीचे दर्शन घेणे म्हणजे पाप होते.आणि बौद्ध झालो तेंव्हा सर्व देवच झुगारून दिले त्यामुळे त्यांचा काही संबंधच नाही.तरीही गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची चढाओढच लागलेली दिसते.इतकेच काय तर आमचे मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या लोकांना जेंव्हा प्रमोशन मिळते तेंव्हा ते त्यांच्या कर्तुत्वावर विश्वास दाखवण्यापेक्षा सगळे श्रेय साईबाबा किंवा बालाजीला देतात आणि साई वारी किंवा बालाजी वारी हमखास करतात.

आणखी एक महत्वाची बाब म्हणजे ,हिंदू धर्मातून आपण बौद्ध झालो आहोत.आणि आता बरेच लोक बौद्ध धाम्मातून ख्रिस्ती  धर्माकडे वळत आहेत.आणि आपण हे उघड्या डोळ्यांनी बघत आहोत.
या सर्व बाबी बाबासाहेबांना आवडल्या असत्या का?  याचा विचार करण्याची आज वेळ आहे म्हणून बाबासाहेबांना अभिवादन करण्यापूर्वी स्वताला तपासून पहा कि आपण खरेच बाबासाहेबांच्या विचारधारेवर चालतो का? आपण त्यांचे स्वप्न साकार करू शकतो का?